टाकळीभान नेवासा रोडवर आयशर व टू व्हीलरचा भीषण अपघात (दुचाकीवरील एकाचा मृत्यू दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक)

दिलीप लोखंडे 

टाकळीभान - प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान नेवासा रोडवर बुधवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० च्या दरम्यान हॉटेल किंग पॅलेस समोर मालवाहतूक करणारी आयशर वाहन MH17 C V-7305१७ ही श्रीरामपूर संभाजीनगर कडे जात असताना टाकळीभान नेवासा रोड वरील हॉटेल किंग पॅलेस समोर टू व्हीलरव MH 17CC-9258 व मालवाहतूक करणारी आयशर वाहन यांच्यात समोरासमोर जोराचा भीषण अपघात झाला. यामध्ये टाकळीभान येथील दुचाकी वरील सनी गोविंद रणनवरे ( वय २२) राहणार टाकळीभान अहिल्यानगर येथे उपचार नेत असताना मृत्यू .

तर लखन माळी (वय २३) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे हलविण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत. दुचाकीचा पुढील भागाचा चक्का चुरा झाला आहे ,

Post a Comment

0 Comments