सिल्लोडचा ऐतिहासिक जैव ठेवा जपण्यासाठी अभिनव प्रतिष्ठानचा पुढाकार, शतकी वयोमानाचा व शेकडो वट वाघळांना अधिवास देणारा पिंपळ शहराचा "नगर हरीत वारसा " घोषीत --




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२६ - राज्यातील शंभर हुन अधिक वयोमान असलेल्या देशी वृक्षांना " वारसा वृक्ष " हेरिटेज ट्री " म्हणून जतन करण्याचा शासन निर्णय होऊन ८ वर्ष झाली मात्र यावर राज्यात कुठे ही विशेष काम झालं नाही मात्र सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व जैवविविधता संवर्धनाचे राज्यभर कार्य करणारे डॉ. संतोष पाटील यांनी सिल्लोड शहरास हा बहुमान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. 

शहराच्या पश्चिमेस प्रकाश बनसोड यांच्या शेतात शंभर हुन अधिक वयाचा पुरातन पिंपळ वृक्ष आहे. त्यावर गत ५० हुन अधिक वर्षा पासुन "इंडियन फ्लाइंग फॉक्स फ्रुट बॅट " या प्रजातीची वट वाघळे अधिवास करत आहे. या सोबत इथे रातथाऱ्यास बगळे व वंचक पक्षी ही येतात. ही वट वाघळे फलाहारी असून ती फळं खाऊन त्यातील बीज प्रसार होतो व निसर्गात आपसूक झाडे वाढीस लागतात. सदर वृक्ष नगर हरीत वारसा व्हावा म्हणून नागरिक,संबंधित शासकीय अधिकारी, शेत मालक,लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, तालुक्यातील निसर्ग प्रेमी नागरिक यांची लोकानुमती मिळवण्यासाठी सह्यांची मोहीम राबवून शासनाच्या सामाजिक व प्रादेशिक वनविभागाच्या सहयोगाने या वृक्षास तहसीलदार संजय कुमार देवराये, सामाजिक वनिकरण चे वनपाल विजय पाटील, अभिनव चे अध्यक्ष किरण पवार यांनी हा नगर हरीत वारसा म्हणून घोषित केला आहे. यां बाबतचा माहिती असलेली फ्रेमचे विमोचन करून तहसील कार्यालयात लावण्यात आली.या प्रकारचा हा राज्यातील प्रथम उपक्रम आहे.  
  
                     ---- काय योगदान आहे यां नगर हरीत वारसाचे--- शतकी जीवन मान असलेला हा मोठा पिंपळ दररोज सुमारे ऑक्सिजन वातावरणात उत्सर्जित करतो.यावर अधिवास करणारी शेकडो वट वाघळे अन्न साखळी चा दुवा असून परिसराच्या शेतीत व वृक्ष यांच्या परागी भवणात मोलाची भूमिका बजावतात. साप, घुबड, शिक्रा, सर्प गरुड यांचे वाघळं ही भक्ष असून मृत वाघळे मुंग्या, पाली, सरडे, झुरळ यांचे अन्न आहे. या वृक्षावर सूर्य पक्षी, पर्पल शिंजीर, सातभाई, लालबुड्या बुलबुल, होला, वेडा राघू ई. पक्षी फळं खातांना वेळोवेळी आढळून आली आहे. या ऐतिहासिक वृक्षा पासुन अनेक पिंपळ आसपास च्या परिसरात उगले आहे. या शेकडो वटवाघळांनी ही हीच भूमिका पार पाडली आहे.   
         ------- हा जैव वारसा येत आहे धोक्यात--- ही वाघळे आता आय. यु. सि. एन. च्या यादीत संकटग्रस्त म्हणून नोंद आहेत.मंदिर परिसरात लग्ना निमित्ताने येणारे डी. जे. चा प्रचंड आवाज करून तसेच रात्रीचा मोठा उजेड,नागरीकरण यामुळे पूर्वी पेक्षा आता इथे वट वाघळे संख्येने कमी झाली आहे. जवळच आता रेल्वे स्टेशन होईल त्याचा ही परिणाम यावर होईल. या परिसरात अजून रुस्टिंग उपयोगी वृक्ष आम्ही रोपीत आहोत,करिता शेतकऱ्यांनी मदत करावी .
                
   डॉ. संतोष पाटील, वन्यजीव संवर्धक, सोयगाव - सिल्लोड.

Post a Comment

0 Comments