सोयगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.१९-- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा दि.१९ गुरुवारी शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्रे असलेले भगवे झेंडे शहरातील मुख्य बाजार पेठेसह ठिकठिकाणी लावण्यात आले होते.यामुळे शहर भगवेमय झाले होते. दरम्यान सोयगाव बसस्थानकाजवळ राम झेरॉक्स या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सोयगाव शहराचे प्रथम मा. नगराध्यक्ष कैलास काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


तर विशाल ढेपले यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती केली. यावेळी माजी सरपंच वसंत बनकर,सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे, राहुल सोनवणे, अमोल निकम, राम फुसे, महेश मानकर, राम सोहणी, अमोल कायस्त, मुरलीधर बागले, रवी भाऊ, दिपक पाटील, संतोष पवार, सागर कोकाटे, विशाल सोनवणे, गणेश कापरे, केयुर पानसर,दिलीप सुरडकर,संदीप सुरडकर,भैय्या परदेशी, मयूर मनगटे, मंगेश सोहनी,हर्षल पाटील,छगन सोनवणे आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments