टाकळीभान: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे शिवजयंती उत्सव (तारखेप्रमाणे) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ९.३० वा. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन हनुमान गडचे प्रमुख ह. भ. प. संतोष महाराज चौधरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
व छत्रपती शिवरायांची आरती संपन्न झाली. यावेळी महाराज मार्गदर्शन करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हा शंभू महादेवाचा अवतार असून ज्या ज्या वेळी धर्मावर संकट आले त्यावेळी छत्रपती शिवरायांसारख्या योध्याने अवतार घेऊन धर्माचे रक्षण केले आहे.
त्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे अजरामर असे कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी जयघोषाने परिसर दुमदुमला. यावेळी चौधरी महाराज यांचा ग्रामस्थांच्या वतीने मा. सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कु.रुई सचिन जाधव या चिमुकलीने छत्रपती शिवरायांचा सुंदर पोवाडा गायला. तसेच कु. सिया चेतन काठेड हिने काठ्यांच्या कसरतीचे प्रात्यक्षिक करून दाखवत उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रम प्रसंग सेवा संस्थेचे चेअरमन मंजाबापू थोरात, शिवसेनेचे जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे, अशोकचे संचालक शिवाजीराव शिंदे, उपसरपंच कान्हा खंडागळे, मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, माजी चेअरमन राहुल पटारे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे,प्रा. कार्लस साठे, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब भिंगारदिवे, भाऊसाहेब मगर, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल पटारे प्रा. जयकर मगर,शिवाजीराव धुमाळ, श्रीधर गाडे, युवा नेते भाऊसाहेब पवार, एकनाथ पटारे, ॲड.धनराज कोकणे, रावसाहेब वाघुले, आबासाहेब रणनवरे, अनिल दाभाडे,नारायण काळे अनिल बोडखे, अक्षय कोकणे, गणेश पवार, बापूसाहेब शिंदे,सुधीर मगर, अनिल कोकणे, रघुनाथ शिंदे, विश्वास कोकणे, नंदकुमार जाधव,अभिजीत लेलकर, पांडुरंग मगर,भाऊसाहेब गव्हाणे, सुजित बोडखे, पवन मगर, रणजीत मगर, अप्पासाहेब रणनवरे, कारभारी जाधव,बाळासाहेब शेळके, मनोज मगर,तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त मंडळ, किसनगिरी बाबा भक्त मंडळ, राजमुद्रा ग्रुपचे सदस्य आदीसह शिवप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments