सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दानवेंचा सत्तारांना दे धक्का, शिवसेनेला स्थानिक कार्यकर्त्यांचा फटका --



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०९-- सोयगाव तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना धक्का देत जिल्हा परिषद गट ०२ व पंचायत समिती गणाच्या ०३ जागांवर घवघवीत यश मिळाले आहे.तर आमदार अब्दुल सत्तार यांना जिल्हा परिषद गटात खाते ही उघडता आले नसल्याने तालुक्यात सत्तारांचा जनाधार कमी होत असल्याचे समोर आले आहे. 

शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळे शिवसेनेला दोन पंचायत समिती गण वगळता इतर ठिकाणी मोठा फटका बसल्याची चर्चा मतमोजणी परिसरात सुरू होती. तर आमखेडा गटातील भाजपाच्या पुष्पा प्रकाश काळे यांनी नियोजनबध्द प्रचार करून भाजपचा गड पुन्हा राखला आहे.
          याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गणांसाठी दि.०९ सोमवारी मतमोजणी पार पडली. जिल्हा परिषदेच्या फर्दापूर गटातून भाजपच्या माहीन इद्रिस मुलतानी या ४७३१ मतांनी विजयी झाल्या. पंचायत समितीच्या फर्दापूर गणातून भाजपचे राहुल अंकुश राठोड हे २२६८ तर सावळदबारा गणातून भाजपचे उत्तम महारू चव्हाण हे २२४२ मतांनी विजयी झाले. जिल्हा परिषदेच्या आमखेडा गटातून पुष्पा प्रकाश काळे या ३२६५ मतांनी विजयी झाल्या तर पंचायत समितीच्या आमखेडा गणातून भाजपच्या जयश्री गजानन पवार या १९०६ तर निंबायती गणातून शिवसेनेच्या (शिंदे गट) सविता सोपानराव गव्हांडे १४८८ मतांनी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या गोंदेगाव गटाच्या शिवसेना उबाठा च्या सुनीताबाई चंद्रशेखर चव्हाण या ६४५ मतांनी विजय झाल्या. पंचायत समितीच्या गोंदेगाव गणातून शिवसेनेच्या (शिंदे गट)९६० तर बनोटी गणातून शिवसेनेच्या (उबाठा) वैभवी सागर पाटील या ४४१ मतांनी विजयी झाल्या. जिल्हा परिषद भाजप - ०२, शिवसेना (उबाठा)- ०१, पंचायत समिती भाजप -०३, शिवसेना (शिंदे गट)-०२, शिवसेना (उबाठा)-०१ असे पक्षीय बल आहे. दरम्यान मतमोजणी ठिकाणी व परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments