करण्यात आला. रेशीम बाग मैदान नागपूर येथे देशातील 28 राज्यातून शिंपी समाज बांधव एकत्र आला या विश्व महासंमेलनाचे अध्यक्ष श्री.भास्कर टोम्पे मुख्य समन्वयक श्री.अनंतजी जांगजोड मुख्य संयोजक श्री.ईश्वर धिरडे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ. मिनल कुडाळकर ,मार्गदर्शिका उषाताई पोरे संयोजीका वर्षालीताई तूपसारखे या कार्यक्रमाची आयोजन समिती यावेळी अमरावतीचे खासदार श्री.अनिलजी बोंडे,श्री.कनुभाई पटेल,गुजरातचे चित्रपट श्री.अभिनेते गोविंदजी नामदेव. हरिभक्त परायण,नामदेव महाराज यांच्या १७ वंज ह भ प श्री.विठ्ठल महाराज नामदास पंढरपूर ,ह भ प जितेंद्रनाथ महाराज, सप्त खंजिरी वादक श्री.सतपाल महाराज, श्री.गोविंद गौरी महाराज .केंद्रीय पदाधिकारी श्री.ज्वाला प्रसाद, श्री.बाळासाहेब आंबेकर श्री .नानासाहेब पाथरकर, कर्नाटकचे अध्यक्ष श्री.कृष्णा उरणकर, त्याचबरोबर सामाजिक,अध्यात्मिक, शैक्षणिक,राजकीय पदावर असलेले मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. हरियाणा ,राजस्थान, बिहार ,गुजरात ,कर्नाटक ,गोवा ,झारखंड ,उत्तर प्रदेश आसाम, तामिळनाडू ,ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळा ,महाराष्ट्र ,मद्रास इत्यादी ठिकाणाहून आलेल्या मान्यवरांचा मंचावर सत्कार करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रातून सांगली, सातारा, कोल्हापूर सोलापूर,या भागातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहिला. या कार्यक्रमाबद्दल विनम्र आभार व्यक्त करताना मीनलताई म्हणाल्या ,भारतभर भ्रमण करून संघटन या चार अक्षरी शब्दावर चांदा ते बांधा .शिंपी बांधवांपर्यंत पोहचता आले.भेटीआणि निमंत्रण आग्रहामुळे समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी मोलाची साथ दिली. सर्वजण एकत्र आल्यामुळे स्वबळावर समाजासाठी कोणतीही गोष्ट शक्य होईल. हे सिद्ध झाले.कार्यक्रम स्थळी आनंदाने लोक भेटी घेत होते.त्यावेळी डोळे भरून आले.असेही त्या म्हणाल्या .अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे दरवर्षी प्रत्येक राज्यात असा स्नेह मेळावा होईल. अशी समाज बांधवांनी ग्वाही दिली .संघटनेची पहिली पायरी सार्थ ठरली.समाज एकत्र येऊ शकतो. नामदेव महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी ज्या ज्या गावांमध्ये आम्ही पोहोचलो . पश्चिम महाराष्ट्रातून कडून खूप आदर, प्रेम व सन्मान मिळाला.त्यांनी आम्हा सर्वांचा मान राखला . त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.अनेक अडचणी आल्या.या कार्यक्रमात महिला शक्ती श्रेष्ठ ठरली.परंतु संघटनेसाठी सार्थ साथ देण्याचा संकल्प पूर्ण केल्याचे समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून कुठे कमी पडले असल्यास .समाज बांधवांकडून क्षमा असावी. माझ्यासोबत नेहमी लहान बंधू म्हणून खंबीर राहणारे ,हाडाचे कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष मुळे कडेगाव, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदाताई जौंजाळ, प्रश्विच महाराष्ट्र महिला संघटक सौ.सुचिता महाडीक,प्रश्विच महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर पंतगे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री.भारत कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.नारायण काकडे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री.चंद्रकांत चुंबळकर,सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सो हेमलता चांडोले,सुनीता औंधकर,रेश्मा माळवदे राजश्री शि़गन, स्नेहल कुडाळकर स्मरणिका संपादक प्रमुख अनिल खटावकर ,सांगली जिल्हा अध्यक्ष उदय मुळे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत खटावकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश पंतगे, कडेगांव, जिल्हा जनसंपर्क प्रमुख श्री.अरविंद चांडोवले,तालुका अध्यक्ष हेमंत कुमार वेल्हाळ,खजिदार योगेश बकरे इत्यादी सर्व जिल्हा मध्ये जिल्हा, तालुका,शहर सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली आवर्जून सांगावे असे माझ्या कुटुंबाची सोबत लाख मोलाची आहे.
तासगावची कन्या आणि डिग्रजची सून म्हणून कायम अभिमान राहील.
असं त्या म्हणाल्या.शेवटी
श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जयकाराने कार्यक्रमाची सांगता झाली.झाली.
*(चुकीन कोणाचे नाव राहिले असेल क्षमा असावी)*
नंदकुमार बगाडे.
0 Comments