दिलीप शिंदे
सोयगाव.दि. ०८-जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकी साठी तालुक्यातील तीन गट आणि सहा गणातील ११३ मतदान केंद्रावर ८७,७४७ पैकी ३१४८६ पुरुष मतदार तर २८५९६ स्री मतदार अशा एकूण ६०,०८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. असून तालुक्यात एकूण ६८.४७ टक्के मतदान झाले आहे दुपारी साडे तीन वाजेपर्यंत केवळ ५२.४० टक्के मतदान झाले होते.तीन गटासाठी ११ महिला व सहा गणांसाठी २६ उमेदवार असे ३७ जणांचे भवितव्य शनिवारी मतपेटीत बंद झाले आहे.
दरम्यान सुरुवातीला दुपारी तीन वाजेपर्यंत तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर शुकशुकाट होता सकाळी मात्र गर्दी होती परंतु मध्यंतरी च्या काळात शांतता होती दरम्यान गलवाडा येथील मतदान केंद्रावर दुपारी अचानक ई व्ही एम बंद पडल्याने अर्ध्या तासांवर येथील मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती त्यामुळे मतदारांना घरी परत जावे लागले होते. अर्ध्या तासानंतर मशीन सुरू झाल्यावर प्रक्रिया सुरू झाली परंतु मतदान प्रक्रिया दुपारी ठप्प असल्याने गलवाडा येथील केंद्रावर सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा होत्या त्यामुळे गलवाड्यात एक तास उशिरा मतदान प्रक्रिया सुरू होती दरम्यान तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदारांना यादीत नावेच सापडत नसल्याचा प्रकार घडल्याने मतदारांची तारांबळ उडाली होती काही ठिकाणी मतदान केंद्रात मजूरांना सायंकाळी उशिरा पोहचल्या मुळे मतदानाची संधी हुकली होती. आमखेडा मतदान केंद्र तीन हे भूमी अभिलेख कार्यालयात होते. दरवाजाच्या मध्यभागी जवळपास दीड तास पोलिस वाहन उभे असल्याचे स्थानिक उपस्थित मतदारांनी सांगितले. ज्या ठिकाणी वाहन उभे होते तो मतदान केंद्राकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता होता. वाहन मध्येच उभे असल्याने
महिला मतदारांना या मतदान केंद्राकडे जाण्यासाठी पायपीठ करावी लागली होती.या प्रकारामुळे मतदारांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान तालुक्यातील ११३ मतदान केंद्रावर किरकोळ प्रकार वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले आहे.
0 Comments