टाकळीभान प्रतिनिधी- लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन व्हावी ही अखिल महाराष्ट्र लोहार समाजाची व स्व. बळीरामजी खरे सारख्या जाणत्या समाज सेवकांची इच्छा होती व अखेर दि. ३१.१२.२०२५ रोजी शासन दरबारी नोंदणीकृत झाली.
कित्येक वर्षे लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन व्हावी यावर चर्चा व कार्य चालू होते,त्यासाठी विविध भागात एकूण दहा मिटिंग घेण्यात आल्या, त्यात ठाणे येथे स्व. बळीरामजी खरे साहेबांनी दि. ०१ सप्टेंबर २०२४ व दि. ०५ जानेवारी २०२५ रोजी दोन मिटींग भव्यस्वरूपात आयोजित केल्या व त्यातूनच लोहार समाजाचा आवाज बुलंद होऊन निर्णायक मोडवर लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याची निव ठेवण्यात आली. स्व.खरे साहेब व ॲड. युवराज जाधव, श्री दिलीप वसव व संपूर्ण टीम कामाला लागली खरे साहेबांनी ॲड. युवराज जाधव यांना ठाणे येथे दि.१५.०१.२०२५ रोजी बोलावून संपूर्ण दस्तावेज देत म्हटले की, युवराज.लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती शासन दरबारी नोंद करण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवितो व तू नक्कीच ती पूर्ण करशील.... पण काळाने काही दिवसातच झडप घातली व स्व. बळीरामजी खरे साहेब यांचे दि. २५ जानेवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले.
स्व. बळीरामजी खरे साहेबांचे निधना नंतर माझ्या कडून लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती शासन दरबारी नोंदणीकृत करण्यासाठी सहा महिन्यांपासून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू ठेवले, शासकीय दृष्टीकोनातून लागणारे दस्तावेज पूर्तता करून एकवीस विश्वस्त कागदोपत्री सर्व माहिती पूर्ण झाली व नोंदणीकृत प्रमाण पत्र तयारी पर्यंत कार्य आले ही पण म्हणतात ना समाज सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून या पवित्र समाज कार्याला ही दि. २५.०७.२०२५ रोजी काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या व मानसिकतेच्या एका लोहार समाज व्यक्तीने लोहार समाज राज्य समन्वय समिती नोंदणी (Registration) न होणे बाबत मा. सहायक धर्मादाय कार्यालय ठाणे येथे विरोध केला व लिखित अर्ज दाखल केला.... पण स्व. बळीरामजी खरे साहेब हे स्वर्गातून सुद्धा नक्कीच पाहत असतील व समाज कार्याला विरोध म्हणजे साक्षात देवाला विरोध म्हणून परमेश्वराने कुठल्याही विरोधाला न जुमानता अखेर दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती शासन दरबारी अधिकृत नोंदणीकृत झाली व अनाधिकृत व बोगस म्हणणाऱ्यांना देवाने मोठी चपकार मारली व समस्त महाराष्ट्रतील लोहार समाज व स्व. बळीरामजी खरे साहेब यांचे स्वप्न अखेर पूर्ण झालेच.
लवकरच दि. १५.०२.२०२६ रोजी, सकाळी १०:०० वाजता, गाडी लोहार समाज उन्नती मंडळ कल्याणचे, लोहश्री भवन, लोकग्राम पोलीस चौकी जवळ कोळसेवाडी कल्याण पूर्व* या ठिकाणी लोहार समाज हितासाठी,पुढील वाटचाल व दिशा ठरविण्यासाठी लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीची मिटींग बोलविण्यात आली आहे व त्यात लोहार समाजाचे प्रश्न, समस्या, जनगणना, समाज व बंधु भगिनीवर होणारे अन्याय अत्याचार, दबाव, प्रलंबित मागण्या व शासनाकडून मिळालेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित होणेबाबत, त्याचा फायदा गरजू इच्छुकाना मिळणे बाबत चर्चा, निर्णय व पत्रव्यवहार, पाठपुरावा करणे बाबत आणि लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती च्या घटना व नियमानुसार, कामकाजास वेग देण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा व विभाग प्रमाणे समन्वय समिती गठीत करून पदाधिकारी नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्या बाबत व पुढे लोहार समाजाच्या विकासात्मक कार्याला गती देण्याचे महान कार्य होणार आहे.
महाराष्ट्रतील समस्त लोहार समाज पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधु - भगिनींनी व युवावर्ग यांनी मीटिंगला हजर राहावे ही विंनती.
ॲड. युवराज मुरार जाधव
( सचिव )
लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समिती समस्त पदाधिकारी व सभासद.
0 Comments