गणेशनगर केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर संच भेट!

राजकुमार गडकरी ( शिर्डी)


शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील गणेशनगर केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून कै.संजय बाळासाहेब गाढवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अमेरिका येथील ग्लोबल नगरी फाउंडेशनचे संचालक रोहित काळे व गीता काळे यांनी गणेशनगर केंद्र शाळेला वॉटर फिल्टर संच भेट दिला.

 रोहित काळे यांनी आतापर्यंत 15 देशांची संस्कृती बघितली, तेथील वातावरण बघितले, परंतु भारतीय संस्कृती इतकी सर्वश्रेष्ठ संस्कृती कोठेही आढळली नाही. संपूर्ण जगात कुठेच नाही पण आपल्या भारत देशाला माता म्हटले जाते, इतर देशांत नाही .हा सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयांना वाटला पाहिजे असे ते विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले. तसेच जिल्हा परिषद शाळा गणेशनगर येथील शाळेतील विद्यार्थी, त्यांची गुणवत्ता, भौतिक सुविधा तसेच बदलत्या तंत्रज्ञानासोबत विद्यार्थ्यांना दिले जाणारे इंटर ऍक्टिव्ह बोर्ड वरील अध्ययन व अध्यापन पाहून गीता काळे यादेखील भारावून गेल्या. गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे यांच्या संपर्क माध्यमातून रोहित काळे यांनी शाळेसाठी वस्तू भेट दिल्या. मिशन आपुलकी अंतर्गत शाळेला वॉटर फिल्टर संच भेट देताना ,श्रीमती सुवर्ण संजय गाढवे ,दर्शन संजय गाढवे ,दत्तात्रय कासार, जयंत गिरमे ,राजेंद्र जाधव, योगेश आग्रे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रोहिणी घोगळ ,सरपंच सुनीताताई कासार ,दत्तगुरू संस्थेचे सोपान काका कासार ,तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप उपस्थित होते. यापूर्वीही शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या अमेरिकेत वास्तव्य असणारे युवराज जाधव यांनी देखील शाळेला लॅपटॉप दिलेला आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास चिंधे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत संजय घोलप यांनी केले .
यावेळी अनिल गाढवे, सोपान कासार, दर्शन गाढवे यांचे मनोगत झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक दत्ता गायकवाड, सुनीता गागरे , व्हेरोनिका गायकवाड, मनीषा निर्मळ, भाऊसाहेब सहाने ,रोशन धनवटे ,सुनील गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments