श्रीरामपुरातील आदर्श लॉज वर्षासाठी बंद अनैतिक देहव्यवसायामुळे कारवाई

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी -अनैतिक देह व्यवसाय चालतात
म्हणून श्रीरामपूर शहरातील रंगोली रोड, वॉर्ड नं.५ येथे असलेल्या आदर्श लॉजवर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने कारवाई केली असून हा लॉज वर्षभरासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


सदर लॉजचे चालक, मालक यांना अनेकदा याबाबत कळवूनही अनेकदा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल होवूनही सदर ठिकाणचा अवैध व्यवसाय बंद झाला नाही. समाजातील असहाय्य व निराधार महिलांना अनैतिक देह व्यापारासाठी पुन्हा पुन्हा प्रवृत्त करणे, त्यातून सामाजिक अशांतता निर्माण करणे तसेच सदर लॉज हे श्रीराम मंदिर, दिगंबर जैन मंदिर, गणपती मंदिर व नूराणी मस्जिद या सार्वजनिक धर्मस्थळानजीक असल्याने तसेच परिसरात निवासी वस्ती शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी आणि भाविकांमध्ये त्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याने या ठिकाणी चालणारे अनैतिक अवैध प्रकार थांबण्यासाठी सक्त पाऊल उचलणे गरजचे असल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय दंडाधिकारी,
 श्रीरामपूर यांच्यामार्फ त याबाबत लॉज चालक, होता. परंतु तो समर्पक नसल्याने काल सोमवार दि.९ फेब्रुवारी रोजी सदर लॉज १ वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याचे निर्देष देण्यात आले आहेत. सदर लॉज पोलिसांनी सीलबंद केला असून कारवाई केली आहे. एसपी सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, 'डिवायएसपी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. देशमुख आणि पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments