अध्यात्मकतेच्या आधारावर लोककल्याण साधण्यासाठी ट्रस्ट करते मोठे कार्य--मंहत आत्मारामगिरीजी महाराज

शिर्डी ( प्रतिनिधी)-आत्मज्ञानातून संन्यास आणि संन्यासातून आत्मबोध ,आत्मबोधातून वैराग्य, वैराग्यातून सेवा, सेवेतून धर्म जागृती आणि धर्म जागृतीतून समाज कल्याण साधता येते. असे श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्मारामगिरी महाराज यांनी म्हटले आहे.


 त्यांनी पुढे म्हटले की, आत्मज्ञान म्हणजे देह, मन ,बुद्धी यांच्या पलीकडील स्वरूपाची अनुभूती होय. आत्मज्ञान म्हणजे केवळ तात्विक विचार नव्हे तर ध्यान, कुंडलिनी, साधना, गुरुकृपा, आत्मचिंतन यांच्या माध्यमातून प्राप्त होणारी अनुभवजन्य जागृती आहे. ती एक समग्र अशी आध्यात्मिक-सामाजिक जीवनदृष्टी आहे. जेव्हा साधकाला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते, तेव्हा विषयासक्ती नैसर्गिकरित्या शिथिल होते.अहंकार, ममता, आसक्ती यांचे बंध सैल होतात.

जीवनाचा केंद्रबिंदू भोग न राहता बोध बनतो.व त्यातून संन्यास जन्माला येतो.संन्यास म्हणजे पलायन नव्हे तर संन्यास म्हणजे अंतरंगातील वैराग्य, संन्यास म्हणजे स्वार्थत्याग व सत्यनिष्ठ जीवन होय.व आत्मज्ञान हे संन्यासाचे मूळ आहे.
संन्यास हा आत्मज्ञानाचा स्वाभाविक परिणाम आहे.खरा संन्यास म्हणजे समाजापासून दूर जाणे नव्हे तर समाजासाठी अधिक व्यापक दृष्टिकोन साधने होय.संन्यासी स्वतःसाठी जगत नाही, तो समाजासाठी ,धर्मासाठी पुढीलपिढीसाठी, समाजाच्या भविष्यासाठी, अज्ञान ग्रस्तांसाठी जगतो.लोककल्याणाचे आध्यात्मिक अधिष्ठान हेसंन्यासातून जन्मणारे आहे. लोककल्याण हे केवळ भौतिक मदत नसते, तरआत्मबोध देणारे शिक्षण,संस्कारयुक्त ,गुरुकुल व्यवस्था असते.ध्यान, योग, साधना, शिबिरे,धर्मसंस्कार व सांस्कृतिक पुनर्जागरण,
नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना,हे सर्व आध्यात्मिक पायावर उभे असलेले लोककल्याण असते. असे सांगत त्यासाठी ट्रस्ट मोठे कार्य करत असते. ट्रस्टमार्फत आत्मज्ञान व ध्यानप्रसार केंद्रे, गुरुकुल व संस्कार शिक्षण, आध्यात्मिक साहित्य निर्मिती व वितरण, योग-ध्यान व कुंडलिनी जागृती शिबिरे, गरजूंसाठी सेवा अन्नदान, वस्त्रदान, मार्गदर्शन हिंदू धर्म व संस्कृतीचे संवर्धन समाजात नैतिकता, सदाचार व अध्यात्मिक जाणीव जागृती करता येते. म्हणूनच श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्मारामगिरी ट्रस्ट लोककल्याण कार्यासाठी स्थापन करण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली आहे.

Post a Comment

0 Comments