आमखेडा गटाच्या बहुजन समाज पक्षाच्या दिव्यांग महिला उमेदवार जखमी, निवडणूक विभागाचा नियोजनाचा अभाव ---



दिलीप शिंदे
सोयगाव दि. ०७ -- सोयगाव तालुक्यातील आमखेडा जिल्हा परिषद गटाच्या बहुजन समाज पक्षाच्या दिव्यांग महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे या मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर गेल्या असता त्याठिकाणी व्हीलचेअर नसल्याने कुबड्यांची मदतीने मतदान केंद्रात जात असताना कुबडी सरकल्याने पडून जखमी झाल्या त्यांना तात्काळ सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून विश्रांतीचा सल्ला दिला. घडलेल्या घटनेबाबत निवडणूक विभागाच्या नियोजनावर नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
          याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील आमखेडा जिल्हा परिषद गटाच्या बहुजन समाज पक्षाच्या दिव्यांग महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे या मतदान केंद्र असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक ०२ वर मतदान करण्यासाठी गेल्या असता त्याठिकाणी व्हीलचेअर नसल्याने त्या कुबड्याच्या मदतीने मतदान केंद्राकडे जात असताना कुबडी सरकल्याने त्या जमीन वर पडून जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडला.त्यांना तत्काळ सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी उर्मिला इंगळे यांच्यावर प्राथमिक उपचार करून विश्रांतीचा सल्ला दिला.दरम्यान झालेल्या घटनेमुळे उर्मिला इंगळे या मतदान केंद्रावर भेट देऊ शकत नाही. या घटनेमुळे निवडणूक विभागाच्या नियोजनावर जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे. वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया -- मी दिव्यांग महिला असताना देखील प्रस्थापितांच्या विरोधात आमखेडा जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवित आहे.मला इतर मतदान केंद्रावर भेट द्यायची होती त्यामुळं मी लवकर मतदान करून घेऊ या हेतूने मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले मात्र दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे माझ्यावर असा प्रसंग ओढावला.या घटनेमुळे मी इतर मतदान केंद्रावर भेट देऊ शकत नसल्याने या प्रकरणी मला न्याय मिळावा यासाठी पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार देणार आहे.

                                                 उर्मिला संदीप इंगळे 
                                 बसपा उमेदवार आमखेडा गट

Post a Comment

0 Comments