तिडका ग्रामपंचायत चे जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी ---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२८-- सोयगाव तालुक्यातील तिडका ग्रामपंचायत चे जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक हे माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने माहितीच्या अधिकाराचा भंग असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शेख गुलाब यांनी केला आहे.माहिती देण्यास व सुनावणी घेण्यास विलंब करणाऱ्या वर कारवाई करावी अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

             याबाबत सविस्तर माहिती अशी, माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार २५ नोव्हेंबर २०२५ ला तिडका ग्रामपंचायत कडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती.ग्रामसेवक माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने शेख गुलाब यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम १९ (१) प्रमाणे अपिलीय अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे अपील दाखल केली असता अपिलीय अधिकारी सुनावणी न घेता पुढील तारखेचे पत्र देऊन त्यांची बोळवण करीत आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास अधिकारी विलंब व टाळाटाळ का करीत आहेत असा प्रश्न निर्माण झाले असून या दोन्ही अधिकाऱ्यांची माहिती देण्याविषयीची भूमिका संशयास्पद आहे. माहिती अधिकार कायद्याचा एकप्रकारे भंग होत असल्याचे दिसून येत आहे. मागितलेली माहिती न देता दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली असल्याचे शेख गुलाब यांनी लोकप्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. गटविकास अधिकारी काय कारवी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments