राष्ट्रीय विज्ञान दिन

बनसोडे ज्ञानेश्वर 
आपल्या भारत देशामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून दरवर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा केला जातो. भारतीय वैज्ञानिक सी. व्ही .रामन यांचा गौरव दिन म्हणून व विज्ञान युगाने पूर्ण भारतीय समाजाला दिलेले योगदान हे अतिशय मोलाचे असल्यामुळे हा विज्ञान दिन दिवस साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. 

आणि या विज्ञान युगातील विविध अशा प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनामध्ये बरेच काही नवनवीन बदल दिसून येत आहे. विज्ञानातील या अदभुत अविष्कारामुळे आपले जीवन हे अतिशय सुखकर झालेले असले तरी विज्ञान युगामुळे मानवी जीवनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अमुलाग्र असे बदल घडून आले आहे. त्यामुळे दरवर्षी संपूर्ण भारत देशामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सध्याचे युग हे मोबाईल युग आहे तेही विज्ञान युगाचे एक प्रकारे उत्तम उदाहरण आहे.
त्यामुळे आजच्या तरुण वर्गामध्ये विशेषतः विद्यार्थी वर्गामध्ये विज्ञानाची गोडी कशी निर्माण होईल 
.या संदर्भात शाळा महाविद्यालये व ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विविध प्रकारचे मेळावे घेऊन विज्ञानाच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी कशी निर्माण होईल या संदर्भात प्रयत्न केले जातात. फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी भारतातील रमण परिवाराचा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी संपूर्ण भारतभर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतामध्ये अनेक ठिकाणी शास्त्रीय ;शैक्षणिक ;वैज्ञानिक; तांत्रिक; संशोधन सर्व महाविद्यालये, विद्यापीठे! शैक्षणिक संस्था; शास्त्रज्ञ आणि संशोधक २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दिन म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा करून विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले जाते .विज्ञानामुळे आपली प्रगती झाली आहे. विज्ञानामुळेच आपण आहोत . अन्यथा माझ्या माहितीप्रमाणे 
विज्ञानाशिवाय प्रगतीच नाही .अशा प्रकारची या महाविद्यालयामधून व इतर काही शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. विज्ञांनामुळे आपली प्रगती झाली आहे. माझ्या एकंदरीत सूक्ष्म निरीक्षणाअंती विज्ञान युगामुळे च आजचा मानव प्रगती पथावर आहे. त्यामध्ये समाज्या मध्ये होणारे हे जे बदल आहे. ते विज्ञाना मुळेच होत असल्याचे निदर्शनास येतात. आपल्या समाजाज्यात ज्या अनिष्ट चालीरीती; रुढी! प्रथा व अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञान युगा मुळे नष्ट झाल्या आहेत. आपण विज्ञानावर इतके आधारित आहोत की; आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ आहे.हे सुद्धा विज्ञानाच्या प्रगतीचे उत्तम अशा प्रकारचे उदाहरण आहे. आपल्या संपूर्ण दिवसाची दिनचर्या ही या एका छोट्याशा मशीन मुळे वेळेत पूर्ण केली जाते. ही या विज्ञान युगाच्या संदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब आहे हे मात्र मान्य च करावे लागेल.
   ..*✓ म्हणून शेवटी जाता जाता मला असे म्हणावे वाटते की
^^विज्ञानाने केली क्रांती.!
   विज्ञानाने केली प्रगती.
विज्ञानाने दीला एक नवा ध्यास;
विज्ञानाने झाला देशाचा विकास!^^

शब्दांकन
प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे
(पोलीस क्राईम न्यूज ब्यूरो चीफ)
साकुरी. तालुका =राहाता =जिल्हा=अहिल्यानगर
मो. ९६०४७९७३१६

Post a Comment

0 Comments