डीप लर्निंगच्या जोरावर लोणीची झेप , राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक




राजुरी (वार्ताहर) विजय बोडखे 
लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निक च्या कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही माहिती प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी दिली.

मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक, येवला येथे आयोजित टेक्नोफेअर या राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दारोडा प्रतिबंधक  डीप लर्निंग आणि आयओटी वापरून दुकाने व बँकांचे संरक्षण करणारी प्रणाली हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला. सार्वजनिक सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने डीप लर्निंग आणि आयओटी तंत्रज्ञानाचे प्रभावी एकत्रीकरण, तांत्रिक उत्कृष्टता आणि सर्जनशील मांडणी यांमुळे या प्रकल्पाला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली. विद्यार्थ्यांना प्रा. वसिम तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. 
रुपेश हनुमंत आदक, विवेक अनिल लबडे आणि देवेंद्र शिरीष शेजुळ या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण करून संस्थेचा गौरव वाढवला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनिताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील तसेच डॉ. शिवानंद हिरेमठ आणि प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक सुरक्षेसाठी उपयुक्त उपाय सुचवला, ही बाब कौतुकास्पद असून त्यांच्या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित झाला आहे.

Post a Comment

0 Comments