दिलीप शिंदे
सोयगाव दि.११-- सोयगाव तालुक्यातील हळदा घाटाच्या पायथ्याशी वाडी परिसरात बांधण्यात आलेल्या सोयगाव वन परिक्षेत्र कार्यालयाच्या नूतन इमारतीचे दि.११ बुधवारी उप वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्याहस्ते विधिवत पूजा करून उदघाटन करण्यात आले. यावेळी उप वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्याहस्ते नूतन इमारतीच्या आवारामध्ये वड व पिंपळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी,गेल्या पंधरा वर्षांपासून भाड्याच्या जागेत असलेल्या सोयगाव वन परिक्षेत्र कार्यालयाची सोयगाव- हळदा रस्त्यावर हळदा घाटाच्या पायथ्याशी वाडी परिसरात स्वतःची नूतन इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीचे दि.११ बुधवारी उप वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.
दरम्यान नूतन इमारतीच्या आवारामध्ये उप वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या हस्ते वड व पिंपळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सहाय्यक वन संरक्षक आशा चव्हाण छत्रपती संभाजी नगर, सहाय्यक वन संरक्षक स्वप्नील भामरे उपविभाग सिल्लोड, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी जालना दक्षिण, तांबे वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक संभाजीनगर, श्रीमती फुले वनपरिक्षेत्र अधिकारी जालना दक्षिण, ए.पी मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव, प्रवीण कोळी वनपाल सोयगाव, नागरे वनपाल अंभई ,अली वनपाल बनोटी, वनरक्षक तडवी,चौधरी, सणांसे व सर्व वनमजूर आदी उपस्थित होते.
0 Comments