दिलीप शिंदे
सोयगाव दि.१०-- सोयगाव तालुक्यातील जे एम एस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बनोटी येथील परीक्षा केंद्रावर दि.१० मंगळवार पासून बारावीची इंग्रजी भाषेच्या विषयापासून परीक्षेला सुरुवात झाली आहे.
कॉपी मुक्त अभियान राबविण्यासाठी विद्यालयाकडून बारावीच्या परीक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे. बैठे पथक प्रमुख विकास पवार, सहाय्यक परीक्षक धनंजय नलवडे, संजय साळवे हे परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. परीक्षा केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ११ पर्यवेक्षक व ०१ राखीव यांनी परीक्षा केंद्रावर कॉपी मुक्त परीक्षा पार पडली. पोलिस उपनिरीक्षक गजानन आरेकर व पोलिस कर्मचारी राजू बरडे यांनी परीक्षा खोलींची पाहणी केली. परिक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी परिक्षा दरम्यान परिक्षा केंद्रावर शुकशुकाट होत.
0 Comments