दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील एका प्रतिष्ठित मराठी शाळेतील शिक्षकाने ०८ वर्षीय चार चिमुकलींवर अयोग्य ठिकाणी स्पर्श करून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. 'याप्रकरणी संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असुन पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .
शहरातील नामांकित मराठी शाळेतील शिक्षक सचिन महाजन गोणारकर (वय ३५, रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, हल्ली मुक्काम -वार्ड नंबर ०७, श्रीरामपूर) या शिक्षकाची एक ऑगस्ट २०२५ रोजी पवित्र पोर्टलद्वारे संबंधित शाळेवर नियुक्ती करण्यात आली होती. या शिक्षकाने तो शिकवत असलेला वर्गातील इयत्ता दुसरीतील ०४ विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराची माहिती संबंधित विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांकडे केली. याचा जाब विचारण्यासाठी पालकांनी शाळा गाठली, संस्थेच्या प्रमुखांनी सदरचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ नये म्हणून त्यांच्या पालकांना सांगितले.परंतु पालकांनी इतकी निंदनीय घटना असूनही संस्थेचे प्रमुख अडवतात याबद्दल चीड व्यक्त केली.
त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या कानावर पालकांनी घातला.दरम्यान शहर पोलीस ठाण्यात सचिन महाजन गोणारकर या लिंगपिसाट शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे,
आरोपी शिक्षकाला श्रीरामपूर न्यायालयात नेता असताना, पालक वर्ग करून चांगला चोप दिला आहे,
0 Comments