टाकळीभान: श्रीरामपूर येथे दरवर्षी शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोष साजरा केला जातो. श्रीरामपूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील सर्वांनी श्रीरामपूर येथे गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ९ वाजता आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवामध्ये मिरवणुकीसाठी एकत्रित येऊन मोठ्या आनंदामध्ये साजरा करावा असे आवाहन श्रीरामपूर येथील शिवजयंती महोत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील हनुमान मंदिरामध्ये श्रीरामपूर येथे होणाऱ्या शिवजयंती महोत्सव कार्यक्रमानिमित्त गावातील ग्रामस्थांची नुकतीच बैठक पार पडली. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ, तरुण युवक उपस्थित होते. यावेळी श्रीरामपूर शिवजयंती महोत्सव समितीचे निमंत्रक नागेश भाई सावंत म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीतील बांधवांना बरोबर घेऊन स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व आदर्श समोर ठेऊन आपण श्रीरामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी श्रीरामपूर येथे शिवजयंती महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आगामी शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने
व आनंदाने साजरा करावा असे ते म्हणाले. प्रारंभी राजेंद्र मोरगे यांनी श्रीरामपूर येथे होणाऱ्या शिवजयंती महोत्सव कार्यक्रम निमित्त कार्यक्रमाची रूपरेषा सांगून माहिती दिली.तसेच पारंपरिक वाद्यासह श्रीरामपूर येथे १९ फेब्रुवारी रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक सकाळी ठीक ९ वाजता होणार असून यामध्ये शहरासह,ग्रामीण भागातील शिवप्रेमींनी मोटर सायकल रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शरदराव नवले यांनी या कार्यक्रमाबद्दल काही सूचना केल्या. यावेळी गणेश राशिनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
0 Comments