टाकळीभान प्रतिनिधी—"त्रिमूर्ती" माध्यमिक व उच्च माध्यमिक घोगरगाव विद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी कुठलेही दडपण मनात न बाळगता अभ्यासाचे योग्य नियोजन करून येवू घातलेल्या बोर्डाच्या परिक्षेला संयमाने सामोरे जावून चांगले गुण मिळवून उत्कृष्ठ यश संपादन करावे.
तुम्ही संपादन केलेल्या यशातूनच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे वडील साहेबराव घाडगे यांना खरी भावपूर्ण श्रध्दांजली ठरेल.
तसेच या परिक्षेत पहिले तीन मध्ये येणार्या विद्यार्थ्यांना योग्य ते प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येईल. असे आवाहन त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाणच्या उपाध्यक्षा अॅड.स्नेहल घाडगे चव्हाण पाटील यांनी परिक्षार्थी विद्यार्थ्यांना केले.
त्या त्रिमूर्ती च्या १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या आयोजीत शुभेच्छा प्रदान कार्यक्रमा प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी व्यासपिठावर नेवासा पो. स्टे. पो.नि.महेश पाटील, नेवासा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करणसिंह घुले पाटील, स्रि शक्ती ग्रुप श्रीरामपूर अध्यक्षा दिपाली ससाणे, शिवा ट्रष्ट प्राचार्य डाॅ.मेघा साळवे, त्रिवेणी गोसावी, बाळासाहेब काशिद, रामराव बहिरट, छबूराव काळे जेष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे,आदी उपस्थित होते.
पुढे बोलताने अॅड.स्नेहल घाडगे पाटील म्हणाल्या की, माझे वडील स्व.साहेबराव घाडगे पाटील यांनी लावलेल्या या त्रिमूर्तीकच्या छोट्या रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून या शैक्षणीक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. उत्कृष्ठ निकालाची परंपरा तसेच गुणवत्ता पुर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचे सांगून इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परिक्षेला सामोरे जावून यश संपादन करावे. तुम्ही संपादन केलेल्या यशातूनच साहेबांना खरी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली जाईल. असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी स्नेहल घाडगे पाटील या काहीशा भावनिक झाल्याचे दिसून आल्या.
पो.नि.महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शारीरीक आरोग्य सुर्दूड कसे ठेवावे याबाबत मुलमंत्र देवून परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. करणसिंह घुले, दिपाली ससाणे, डाॅ.मेघा साळवे आदी मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
दिपाली ससाने म्हणाल्या क स्त्री शक्ती सक्षमीकरणासाठी व स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थिनींपासूनच स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत व विद्यार्थिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे शिक्षणाचे धडे ही मुलींना देण्यात यावे त्यासाठी वेळोवेळी लागेल ती मदत करू असे आवाहन करत स्त्री शक्तीचा नारा जागवला. ा या कार्यक्रमास सुलतान शेख, अरविंद चौधरी, शैलेश मेघळे, प्रशांत बहिरट, आप्पासाहेब बहिरट, अनिल बनसोडे, नगरसेवक अनिल पवार, प्राचार्य संतोष जावळे, नितिन साळवे, मनिष वेताळ, संदिप काळे, अर्चना जगताप, रेखा दिवे, विकास कौटे, संभाजी गारूळे, ललिता गारूळे, कृष्ण शिंदे, अमोल बहिरट, वनिता नानेकर, नंदिनी सरोदे, रवि कोरडे, हरिश्चंद्र डिके, स्वाती पाचारणे, अनिल पटारे, नम्रता पटारे, मयुरी राऊत, आश्विनी खुरूद, जुमान शेख, रंजित कुमावत, संकेत सावंत, गीतांजली गवारे, शिवाणी बनकर, अमोल तांबे तसेच पत्रकार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावक अर्चना जगताप यांनी तर सुत्रसंचालन संभाजी गारूळे व रेखा दिवे यांनी केले.
चौकट—त्रिमूर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोगरगाव संस्थेचे ज्ञानार्जनाचे सुरू असलेले काम उत्कृष्ट पणे अविरत सुरू आहे. या विद्यालयातील गुणवत्ता, शिस्त व स्वच्छता पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. भविष्यात विद्यालयाच्या चांगल्या कामाला आमचे कायमच सहकार्य असेल. विद्यालयाने राबविलेले शैक्षणीक उपक्रम समाजासमोर मांडण्यास आमची तुम्हांला साथ असेल असे प्रतिपादन पत्रकारांच्या वतीने बापूसाहेब नवले यांनी केले.
0 Comments