ही यंत्रसामग्री संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणार असून, त्यामुळे रुग्णांच्या आजारांचे अचूक व वेगवान निदान करण्यास मोठी मदत होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पांडे यांचा सत्कार करण्यात आला.
अशा प्रकारच्या देणग्यांमुळे संस्थानच्या विविध सेवा कार्यांना अधिक गती मिळून, भाविक व रुग्णसेवा अधिक प्रभावीपणे करता येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
0 Comments