श्रीरामपूर तालुक्यात ०४ हजार एकरावर इंधन प्रकल्प उभा राहणार




टाकळीभान ( प्रतिनिधी -)

 श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ०४ हजार एकर जमिनीवर विश्व दर्जाचा शाश्वत विमान इंधन (निगेटिव्ह नेट झिरो इंधन) प्रकल्प उभारला जाणार आहे. या भव्य प्रकल्पाला जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारने महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे.

         मुंबईतील 'झेडआरटू ग्रुप होल्डिंग्स लि.' या कंपनीमार्फत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या बैठकीत विमान वाहतुकीसाठी लागणारे शाश्वत इंधन तयार करणाऱ्या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता या निर्णयाला गती देण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.
        या प्रकल्पासाठी शेती महामंडळाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) वर्ग केली जाणार आहे.दरम्यान या प्रकल्पामुळे श्रीरामपूर तालुक्यात रोजगार उपलब्ध होईल व श्रीरामपूर ची भरभराट होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

Post a Comment

0 Comments