ऐतिहासिक धार्मिक तीर्थक्षेत्र असणारे कोकमठाण गाव आजही जपत आहे धार्मिक परंपरा --हभप संजयजी महाराज जगताप



शिर्डी( प्रतिनिधी)-कोकमठाण हे पूर्वीपासून धार्मिक व अध्यात्मिक ऐतिहासिक अशी भूमी आहे. असे प्रतिपादन हभप संजयजी महाराज जगताप यांनी आपल्या प्रवचनातून केले.


 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात भऊर येथून झाले , त्रिंबकेश्वर कडे दिंडी मजल दर मजल करत जात आहे. ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या
पायी दिंडी विश्रांतीच्या ठिकाणी काकडा भजन प्रवचन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. हि पायी दिंडी कोकमठाण येथील हभप सावळीराम देवराम रक्ताटे यांच्या कडे मुक्कामी असताना तेथे हभप संजयजी महाराज जगताप यांचे प्रवचन झाले. यावेळी त्यांनी कोकमठाण या गावाचा धार्मिक इतिहास आपल्या प्रवचनातून विषद केला.संत रामदासी महाराज व त्यांची परंपरा आजही हे गाव जपत आहे. असे सांगत त्यांनी कोपरगाव बेट ,श्री शुक्लेश्वर महाराज व कोकमठाण आदी परिसराची ऐतिहासिक माहिती आपल्या प्रवचनातून पुराणातील विविध पुरावे व दाखले देत यावेळी दिली. कोपरगाव बेटा मध्ये आजही श्री कचेश्वर शुक्लेश्वर मंदिराच्या मध्य ठिकाणी भगवान विष्णूचे मंदिर आणि संजीवनी विद्या पार आहे. म्हणजेच ते जाज्लव्य तपस्वी ठिकाण दत्तगुरु शुक्राचार्य यांची तपस्वी भूमी आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.कोकमठाण या ठिकाणी पूर्वी पौष महिन्यामध्ये पंढरपूर मधून श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता व सर्व संत मंडळी आले होते. असेही त्यांनी यावेळी दाखले देत आपल्या प्रवचनातून सांगितले.येथे ह भ प सावळीराम देवराम रक्ताटे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. प्रवचन व महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments