दिलीप शिंदे
सोयगाव, दि.१७..निवडणूक आयोगाने मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या बिगुल वाजल्याने सोयगाव तालुक्यातील फर्दापूर गट हा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने फर्दापूर गटात चुरस वाढली आहे. फर्दापूर गटात भाजपाचे निष्ठावान पदाधिकारी असलेले जयप्रकाश चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुढाळ, राहुल राठोड हे तालुक्यातील विशेष फर्दापूर गटातील मातब्बर नेते असतांना भाजपा कडून फर्दापूर गटात बाहेरील उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात भाजप व आमदार अब्दुल सत्तार यांच्यात विस्तव ही जात नसल्याने सोयगाव तालुक्यात महायुतीत बिघाडी होणार हे निश्चित आहे.शिवसेने कडून ही सक्षम उमेदवार दिला जाऊ शकतो. शिवसेनेच्या उमेदवारा विरोधात आर्थिक दृष्ट्या सक्षम स्थानिक उमेदवार भाजप कडे नसल्याने स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यावर संक्रांत येणार आहे. शिवसेना स्थानिक गटातील उमेदवार देणार असल्याने स्थानिक व बाहेरील उमेदवार हा प्रचाराचा मुद्दा जिल्हा परिषद निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे.मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात हे मतदारच ठरवणार आहे.
0 Comments