श्री गणेश जयंती निमित्त लोणी येथील वरद विनायक मंदिरात २० ते २३ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन--हभप उद्धव महाराज मंडलिक

शिर्डी(प्रतिनिधी)-प्रत्येक देवस्थानातून संत विचारांना जागवण्याचे व संत महात्म्यांचा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम होत असते. असेच काम लोणी येथील श्री वरद विनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने होत असून श्री गणेश जयंती निमित्ताने लोणी येथील श्री वरद विनायक मंदिरात वीस ते तेवीस दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा गणेश भक्तांनी ,भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे.

हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी पुढे म्हटले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गणेश जयंती निमित्ताने चार दिवस म्हणजे वीस ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत लोणी ते निर्मळ पिंपरी या रस्त्यालगत असणाऱ्या लोणी येथील भाविकांचे श्रद्धास्थान ठरलेल्या श्री विरद विनायक मंदिरामध्ये भव्य असे धार्मिक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी दहा ते बारा व रात्री सात ते नऊ या कालावधीत दोन कीर्तन होणार आहे.23 जानेवारी या काल्याच्या दिवशी सकाळी दहा ते बारा किर्तन होऊन काल्याचे सहा ते आठ या वेळेत कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत येथे दररोज काकडा, आरती, भजन, पूजन त्याचप्रमाणे श्री गणेश स्तोत्र पठण, श्री गणेश याग, हरिपाठ, प्रवचन ,किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या कालावधीत आप आपल्या गावाने अन्नदान व महाप्रसादासाठी योगदान द्यावे. तसेच सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे व सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा .असे आवाहन ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments