करजगाव मध्ये भिल्ल समाजाच्या महिलांवर प्राण घातक खाल्ला करून विनयभंग आदिवासी बचाव समितीचा आंदोलनाचा इशारा

राहुरी ( प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यातील करजगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी‌ घटना घडली असून आदिवासी भिल्ल समाजाच्या महिला व अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून‌ जीवे मारण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सध्या हे आदिवासी शासकीय रुग्णालय , अहिल्यानगर येथे उपचार येत असून इतका गंभीर गुन्हा घडला असतानाही राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे जिल्ह्यातील भिल्ल समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. 
         राहुरी तालुक्यातील करजगाव येथे भिल्ल समाजाने महाराष्ट्र शासनाच्या ५०ते ६० वर्षापासून अतिक्रमणित केलेल्या गट नंबर २८ मधील जमिनीवर गावातील काही लोक जमा का झाले हे पाहण्यासाठी येथे जमीन कसत असलेल्या आदिवासींनी या लोकांना विचारपूस करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या जमावाने थेट आदिवासी कुटुंबावर प्राण घातक हल्ला केला त्यामध्ये भिल्ल समाजाची लहान मुले, महिला, अल्पवयीन मुली, व घरातील व्यक्ती यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करण्यात आली त्यामध्ये फावडे, कोयते, लोखंडी साळया, लाकडी दांडे यांच्या साह्याने आदिवासींवर प्राण घातक हल्ला करण्यात आला हा हल्ला इतका भयानक होता की अनेक महिला व पुरुष तसेच लहान मुले यामध्ये गंभीर जखमी झाली. तसेच या गावगुंडांकडून घरात घुसून अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला तर महिलांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महिला व अल्पवयीन मुली जीव वाचवण्यासाठी घरात लपल्या असतानाही या जमावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दरवाजे तोडून महिलांवर बळजबरी प्रयत्न केला व गलिच्छ भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून या भिलट्यांची घरे पाडून टाका. घरे पेटवून द्या असे एकमेकाला ओरडून सांगत होते. येथील भिल्ल समाजावर खूप मोठे संकट ओढावले आहे. एवढा गंभीर गुन्हा घडला असतानाही राहुरी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. आज आदिवासी बचाव समितीच्या संस्थापक सदस्यांनी पीडित आदिवासी महिला व पुरुषांची जिल्हा रुग्णालय येथे जाऊन भेट घेतली व आदिवासींना दिलासा दिला. व संताप संताप व्यक्त करून पोलिसांनी आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी बचाव समितीच्या सदस्यांनी दिला आहे. 
यावेळी आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे, शिवाजीराव गांगुर्डे, कैलास दादा माळी, सुभाष पवार, शिवाजी जाधव, संजय गांगुर्डे, सौरव लाहुंडे, प्रमोद चिंदे, दादा निकम, खंडू गांगुर्डे, सुभाष गांगुर्डे, महादेव वाघ, गणेश गांगुर्डे, सोना चिंदे , महेश गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, रामेश्वर गांगुर्डे, अंजली पवार अदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments