महात्मा गांधी संकुलात सूर्यनमस्कार दिन उत्साहात संपन्न



लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात जागतिक सूर्यनमस्कार दिन रथसप्तमीनिमित्त योगविद्या गुरुकुल नाशिक, अहिल्यानगर आणि योग विद्याधाम नांदेड यांच्यामार्फत योगशिक्षिका ज्योती दिगंबर वाबळे यांनी विद्यार्थ्यांना आनंददायी शनिवारप्रसंगी सूर्यनमस्काराची धडे दिली.
 यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शास्त्रोक्त पद्धतीने १४ सूर्यनमस्कार करून घेतली. या सूर्यनमस्कारासाठी योग कार्यकर्ते प्रियंका अंत्रे, अनन्या गर्जे यांची मदत झाली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय डुबे, डॉ. शरद दुधाट, नरेंद्र ठाकरे, विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे आदीसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments