दिलीप शिंदे
सोयगाव दि.२४ - सिल्लोड बस स्थानकात नुकतेच काँक्रिट करण्याचे काम एका ठेकेदारा द्वारे सुरु आहे. या स्थानकाच्या आवारात एक मोठे २० वर्ष वयाचे वडाचे व पिंपळाचे झाड आहे.नुकतेच एका वर्तमान पत्रात हे झाड काढून टाकावे,ते काढल्या वर पूर्ण काँक्रिट करणे सोपे होईल व इतर गोष्टीना फायदा होईल असे वृत्त प्रकाशित झाले होते.
याचे गांभीर्य जाणत येथील अभिनव प्रतिष्ठान चे डॉ. संतोष पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली असता, याचा कुठे अडथळा जाणवला नाही तसेच गंभीर बाब म्हणजे या झाडास २७ लहान मोठे खिळे ठोकलेले होते. बस स्थानकात फेरी विक्रेते हे कुरकुरे, खाद्य पदार्थ आदीच्या पिशव्या यास लटकवतात, तसेच विविध जाहिराती चे बॅनर साठी हे खिळे ठोकलेले होते. डॉ. पाटील यांनी वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष असल्याने,त्याची निसर्ग अन्न साखळीत महत्वाची भूमिका असल्यामुळे आगार प्रमुख विजय काळवणे, वन परीक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक यांची भेट घेतली व हा वृक्ष व पिंपळ तोडू नये म्हणून विनंती अर्ज दिला.वन विभागाच्या परवानगी शिवाय ठेकेदार यास तोडू शकत नाही. पाटील यांनी झाडातील २७ खिळे काढून झाड वेदना मुक्त केले. झाडास २ ठिकाणी कीड देखील लागली आहे.खिळे काढून पोकळ झालेल्या भागात झाडास कीड लागू नये म्हणून त्यात कीड नाशक औषधं भरले. हे झाड आता तोडले जाणार नाही अशी ग्वाही वनाधिकारी दिलपाक व आगार प्रमुख विजय काळवणे यांनी दिली. या झाडावर रात्री रात थारा साठी ( रुस्टिंग ) बगळे, वंचक आदी पक्षी विसावतात.
0 Comments