दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील मुलींची घटती संख्या चिंता वाढवणारी असून तालुक्यातील अकरा गावामध्ये हजार मुलामागे फक्त पाचशेच मुली असल्याचे निदर्शनास आले असल्याचे आ. हेमंत ओगले यांनी स्पष्ट केले.
नूकताच श्रीरामपूर नगरपालीकेच्या वतीने शहर व ग्रामीण पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. त्या प्रसंगी ओगले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमण मुथ्था हे होते.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा बँकेचे संचालक तथा नगरपालीकेचे नवनिर्वाचीत नगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब दिघे, डॉ. वंदना मुरकुटे, मंजूश्री मुरकुटे, कांचनताई सानप आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताने आ. ओगले म्हणाले की, हल्ली मुलींचा जन्मदर घटत आहे. मुली पेक्षा मुलगा बरा असा काहीसा समज लोकांमध्ये झाल्याने मुलींची संख्या कमी होत असून मुलांची संख्या वाढलेली आहे. आजमितीला बहुतांशी तरूणांचे लग्न होणे कठीण झाले असून अशीच परिस्थिती पुढेही राहीली तर भविष्यात बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. सध्या मुलींची घटती संख्या हा चिंतेचा विषय ठरत असल्याने यासाठी सर्वपक्षियांनी तसेच पत्रकारांनी समाजामध्ये जावून
नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सध्यस्थितीत तालुक्यातील अकरा गावामध्ये एक हजार मुलामागे पाचशे मुली असल्याचे समोर आल्याने निम्म्याने मुलींचा जन्मदर घटला आहे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरत असून "बेटी बचाव" काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलीम पठाण यांनी केले. यावेळी प्रिंट मिडीया, इलेक्टॉनिक मिडीयाचे सर्व पत्रकार, संपादक उपस्थित होते.
0 Comments