लोणी /प्रतिनिधी मी पुण्यामध्ये राहते. मी आता सध्या झी मराठीवर पारू या सिरीयल मध्ये काम करत आहे. आता या अगोदर माझे मराठी चार मूवी आणि एक साउथ मूवी झाला आहे. त्यापैकी आता साउथ मूवी येत्या 6 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये थेटर ला येत आहे तरी आपण सर्वांनी हा मूवी आपल्या जवळच्या थेटर मध्ये जाऊन बघावा ही विनंती.या अगोदर माझा पहिला मराठी मूवी झाला शनिवार तसेच इतर चार मूवी मध्ये माझी छोटी भूमिका आहे पण ते मूवी अजून येणे बाकी आहे आत्ता सध्या माझा साउथ चा मूवी येत आहे तसेच माझी सुरुवात ही चार वर्षांपूर्वी एक्टिंग मध्ये झाली.
मी अगोदर मॉडलिंग सुरुवात केली तसं पाहिला गेला तर मी बाय प्रोफेशनल आयटी कंपनीमध्ये जॉब करत होते गेले बारा वर्षे मी लग्नानंतर जॉब केला आणि नंतर मॉडलिंग मध्ये सुरुवात केली. माझी मैत्रीण सोनाली हिने मला मॉडलिंग क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या जाहिरात देखील मी सतत करत होते म्हणजे रांका ज्वेलर्स वस्त्रकला साडी सेंटर पुणे औरंगाबाद मध्ये मसाला ऍड छोटा मोठा ऍड शूट करत गेले त्यादरम्यान माझी ओळख डायरेक्टर प्रमोद पंडित सरांसोबत झाली त्यांनी मला एक गाण्याची संधी दिली त्यामध्ये मी मुख्य भूमिका सादर केले माझ्या गाण्याचे नाव आहे पोरगी कडक. तिथून माझी एक्टिंग करिअरमध्ये सुरुवात झाली त्यादरम्यान मला पहिला मूवी ऑफर आली शनिवार मूवी त्यामध्ये मी सेकंड लीड म्हणून काम केले नंतर हळूहळू मला अजून मराठी चार मूवी मिळाला एक प्रतिशोध दुसरी तिसरा स्मार्ट सुनबाई आणि आता साउथ हिंदी द रिटर्न ऑफ आर्मी मॅन याचे डायरेक्टर बाबू भट यांनी मला खलनायक ची भूमिका दिली त्यामध्ये देखील मी सेकंड लीड मध्ये आहे विशेष म्हणजे बाहुबली प्रमुख आकर्षक प्रभाकर काल के यांच्या बायकोचा रोल मी या चित्रपटात करत आहे. मला खूप आनंद होत आहे की माझ्या या चार वर्षात मी साउथ मूवी पर्यंत पोहोचली आहे. याचे सगळेच श्रेय बाबू भट सर आणि प्रमुख पंडित सर यांना आहे कारण माझ्यासारख्या मध्यमवर्ग कुटुंबातील स्त्रीला अगदी मनापासून मदत करत या वाटचालीवर पोहोचवलं. खरंतर प्रत्येक जणांचं म्हणणं असतं की लग्नानंतर या क्षेत्रामध्ये करिअर करणं खूप अवघड आहे, पण माझे कुटुंब माझे मिस्टर मला वेळोवेळी सपोर्ट करत आले माझे सासू-सासरे माझा मुलगा या सर्वांचे मला मनापासून पाठबळ होते आणि त्यांच्या मदतीमुळेच मी आज मला शिखर गाठण्याची हिंमत आली आहे. मी संगमनेर शहरातून पुण्यामध्ये पंधरा वर्षांपूर्वी लग्न करून आले. त्यानंतर मी बारा वर्ष नोकरी केली आणि नंतर मी माझ्या स्वप्नांच्या वाटचालीला लागले सर्वांच्या सहकार्यामुळे मी आज हळूहळू का होईना पण पुढे जात आहे. मी मनापासून सर्वांचे खूप धन्यवाद मानते कारण अडचणी तर भरपूर असतात पण जिद्द आणि चिकाटी असेल तर मार्ग नक्कीच भेटतो यावर माझा विश्वास आहे. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे माझा पहिला हिंदी साउथ मूवी तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा तुमचे आशीर्वाद आणि प्रेम सतत माझ्या सोबत असावेत ही विनंती. माझ्यासोबत काही सहकलाकार देखील नगर जिल्ह्यातले आहेत आणि त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. माझ्यावरती प्रेम करणारा मीडिया व पत्रकार बांधव ची चांगली साथ मिळत गेली विशेष म्हणजे पत्रकार ज्ञानेश्वर साबळे यांच्या संधीने मला माझ्या जीवन प्रवास लेख सादर करता आला.
0 Comments