ऋषी छल्लारे फाऊंडेशन कडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त टाकळीभानच्या न्यू इंग्लिश स्कूलला वृक्ष भेट

ऋषी छल्लारे फाऊंडेशन कडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त टाकळीभानच्या न्यू इंग्लिश स्कूलला वृक्ष भेट

            टाकळीभान प्रतिनीधी - श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाला राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व, ऋषी छल्लारे फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकारचे वृक्ष भेट देण्यात आले. 
                   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व.ऋषी छल्लारे फाऊंडेशनचे गणेश छल्लारे, तर व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम शिंदे , पर्यवेक्षक एस.एस .जरे , पत्रकार हरिभाऊ बिडवे ,श्रीमती एन, ए, पालवे आदी मान्यवर उपस्थित होते .
              कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले . यावेळी मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश छल्लारे म्हणाले की, संपूर्ण जगाला आदर्श माता कशी असावी हे जिजाऊ माँसाहेबानी तर आदर्श पुत्र कसा असावा हे स्वामी विवेकानंद यांनी दाखवून देण्याचे काम केले .आजच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा व विविध खेळांच्या माध्यमातुन व्यायाम तसेच अरोग्याकडे लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन गणेश छल्लारे यांनी केले . यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक संदिप जावळे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली . कार्यक्रमानंतर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, गणेश छल्लारे, पत्रकार हरिभाऊ बिडवे, मुख्याध्यापक आर .एम .शिंदे , पर्यवेक्षक एस .एस .जरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश म्हस्के, यांती केले व सूत्रसंचालन संजना भांड यांनी तर आभार ए.ए पाचपिंड यांनी मानले..

Post a Comment

0 Comments