डेड बॉडी थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणल्याने तणाव .




 टाकळीभान प्रतिनिधी -याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी गोंधवणी रोड परिसरात झालेल्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी असलेला सुनील औटी या युवकाचा आज गुरुवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी त्याच्या नातेवाईकांनी सुनीलची डेड बॉडी आज गुरुवारी रात्री ०९ च्या सुमारास ॲम्बुलन्स मध्ये शहर पोलीस स्टेशन आवारात आणली. या घटनेमुळे पोलीस स्टेशन परिसरात प्रचंड गर्दी जमा झाली असून तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे.
         दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांसह जबाबदारीने परिस्थिती हाताळत आहेत.

Post a Comment

0 Comments