लोणी / प्रतिनिधी
अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी दिव्यांगात्वावर मात करत आपली अभिनेता म्हणून एक नवी ओळख निर्माण केली तसेच सध्या लोकप्रिय असलेले गाणे झटपट पटापट या गाण्याची लोकप्रियता लहानापासून मोठ्यापर्यंत महाराष्ट्रभर क्रेझ वाढत आहे तसेच,द फार्म हाऊस हा मराठी चित्रपट ऑल महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे या चित्रपटामुळे सर्वत्र त्यांच्या चाहता प्रेक्षकाची वाढ होत आहे.
पंचायत समिती राहता च्या वतीने श्री विवेक गुंड साहेब ( गटविकास अधिकारी ) यांच्या शुभहस्ते अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी श्री प्रसाद खंडागळे साहेब ( पंचायत समिती राहता-( पेन्शन विभाग ),श्री जालिंदर वाकचौरे साहेब ( पंचायत समिती राहता -( समाज कल्याण विभाग ),श्री रविंद्र नालकर साहेब ( पंचायत समिती राहता -( प्रशासन विभाग ), ज्ञानेश्वर साबळे ( पत्रकार ) यांच्या उपस्थितीत या सर्व मान्यवरांनी त्यांच्या अभिनयाचे व कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments