लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय कन्या विद्यालयात शासकीय रेखाकला श्रेणी परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
या रेखकला श्रेणी परीक्षेत कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हर्षदा टाचतोडे व गितिका चेचरे यांना अ श्रेणी तर प्रांजल पंडित, अलीना शेख, सायली वीर, श्रेया पवार, सीमा मेटे, कीर्ती हिवाळे, सिद्धी गोडसे, तस्मिया पठाण, गौरी घुले यांनी ब श्रेणी प्राप्त केली आहे. या परीक्षेसाठी एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले असून विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
तर मुले विभागात एकूण २५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून एलिमेंटरी श्रेणी परीक्षेचा निकाल १०० टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय डुबे, डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, माधुरी वडघुले, विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे यांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना मीनाक्षी गांगुर्डे व आर.बी. निकाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments