गेल्या वर्षभरापासून आदिवासींचा ट्रॅक्टर हिसकावून घेऊन डांबून ठेवणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुकादमाला व त्याला सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाला एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. त्यामुळे शिवाजीराव गांगुर्डे यांचे भिल्ल समाजातून कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही आदिवासी ऊस तोडणीसाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गेले होते .हे मजुर कारेगाव येथील संदीप बर्डे यांचा ट्रॅक्टर काम करण्यासाठी सोबत घेऊन गेले होते. सर्व काम व्यवस्थित करत असतानाही काम संपल्यानंतर या मुका दमाने या मजुरांना जीवे मारण्याची धमकी देऊन तसेच मजुरीचे पैसे न देताच ट्रॅक्टर इसकावून घेतला. त्यानंतर या मजुरांनी स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही उलट आरोपीला सहकार्य केले. त्यानंतर ट्रॅक्टरचे मालक संदीप बर्डे यांनी वर्षभर पाठपुरावा केला परंतु मुकादम आणि पोलिसांचे संगणमत असल्याने नेहमी त्यांना उडवाऊडवीची उत्तरे देण्यात आली. सदर प्रकार एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे यांच्या निदर्शनास कार्यकर्त्यांनी आणून दिला त्यानंतर कार्यकर्त्यांसह शिवाजीराव गांगुर्डे यांनी घटना घडली ते पोलीस स्टेशन गाठले व आतापर्यंत आदिवासीचा ट्रॅक्टर का दाबून ठेवला? आरोपी आणि पोलिसांचे साटेलोटे असल्याचा आरोप करून पोलिसांना खडेबोल सुनावले. त्यानंतर जर ट्रॅक्टर आदिवासीला दिला नाही तर यामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी करू असा थेट इशारा दिला व वेगाने सूत्रे फिरवली गेली त्यानंतर गडबडलेल्या पोलिसांनी मुकादमसह ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला हजर केला व मालक संदीप बर्डे यांचे ताब्यात ट्रॅक्टरची चावी देऊन रीतसर ताबे पावती करून ट्रॅक्टर मालकाच्या ताब्यात दिला. व गेल्या वर्षभरापासून पोलीस स्टेशनच्या चकरा मारणाऱ्या ट्रॅक्टर मालकाला दिलासा मिळाला. शिवाजीराव गांगुर्डे यांनी केलेल्या या जिगरबाज कार्यामुळे आदिवासी भिल्ल समाजातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्याबरोबर कैलास दादा माळी, संदीप बर्डे, विक्रम काकडे, संजय गांगुर्डे , अण्णासाहेब गायकवाड, विठ्ठलराव माळी, यावेळी उपस्थित होते. एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी देखील फोन करून शिवाजीराव गांगुर्डे यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments