टाकळीभान प्रतिनिधी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीभान येथे, टाकळीभान केंद्राच्या सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विविध गुणदर्शन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांच्या हस्ते करण्यात आले,
या स्पर्धेमध्ये 18 शाळेतील जवळपास 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ,यामध्ये वकृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, गीत गायन स्पर्धा ,वेशभूषा सादरीकरण स्पर्धा समूहगीत स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा याचे उद्घाटन झाले
या उद्घाटन प्रसंगी श्रीरामपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा टाकळीभानचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे प्रमुख उपस्थिती होती,
संजीवन दिवे साहेब यांनी श्रीरामपूरचा चार्ज घेतल्यानंतर स्थलांतरित विद्यार्थ्यांचा देखील विचार करत सदर विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत ,तसेच त्यांचा संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प याचे देखील प्रचिती तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना येत आहे.
याप्रसंगी गणेश शेळके, पडेगाव बीट शिक्षण विस्तार अधिकारी सुनील दरंदले, केंद्रप्रमुख बेबी जाधव मॅडम, केंद्र समन्वयक गोरक्षनाथ शिंदे, अनिल गायकवाड , बाळासाहेब गायकवाड , एडके सर , सिताराम कुऱ्हे , रमेश कुलकर्णी , विनायक जोशी , बनकर सर, प्रताप कदम , गणेश पिंगळे , किसन शेटे आधी शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
0 Comments