पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन!अहील्यानगर, शिर्डी पाठोपाठ संगमनेरला प्राधान्य



लोणी दि.१९ प्रतिनिधी

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्याचे काम पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून गतीने सुरू झाले आहे. अहील्यानगर, शिर्डी पाठोपाठ संगमनेर येथेही औद्यगिक वसाहत निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या प्रशासनाच्या हालचाली औद्यगिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचन प्रकल्पाचे प्रश्न मार्गी लावतानाच जिल्ह्यातील युवकांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले.महसूल मंत्री पदाच्या कार्यकाळात शिर्डी येथे शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहती करीता उपलब्ध करून औद्यगिक वसाहती मध्ये अनेक मोठे उद्योग येवू लागले विशेष म्हणजे देशाच्या संरक्षण व्यवस्थेत आवश्यकता असलेली साधन सामुग्रीची उत्पादकता शिर्डी येथील औद्योगिक वसाहती मध्ये होणार असून भविष्यात अहील्यानगर जिल्हा डिफेन्स क्लस्टर म्हणून ओळखला जाईल असे नियोजन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यामातून करण्यात येत आहे.

संगमनेर तालुक्यात औद्यगिक वसाहत व्हावी आशी मागणी सातत्याने होत होती.आ.अमोल खताळ यांच्या यासाठी पाठपुरावा सुरू होता.पालकमंत्री या नात्याने संगमनेरच्या औद्यगिक वसाहती करीता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठका घेवून संगमनेरच्या औद्यगिक वसाहतीला मूर्त स्वरूप देण्यासाठी मंत्री विखे पाटील यांचा राहीलेला पुढाकार सुध्दा महत्वपूर्ण ठरणार आहे.

अहील्यानगर किंवा सुपा येथील औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेतला.उद्योजकांमध्ये असलेले भीतीचे दहशतीचे वातावरण कमी करण्यात यामुळे यश आले आहे.

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला अधिकचे पाठबळ मिळावे म्हणून यापुर्वीच शिर्डी येथील विमानतळाचा विकास आणि विस्तार करण्यात येत आहे.विमानतळाच्या टर्मिनल इमारती करीता निधी मंजूर झाला असून,शेजारून जाणारा समृध्दी महामार्ग सुध्दा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला उपयुक्त ठरणार असल्याचे दिसून येते.

औद्यगिक क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शिर्डी येथे टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने कौशल्यवर्धिनी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात ही औद्यगिक वसाहती करीता जमेची बाजू ठरली आहे.सदर केंद्रातून उपयुक्त असे प्रशिक्षण मिळणार असल्याने स्थानिक युवकांना त्याचा निश्चितच फायदा होईल.

Post a Comment

0 Comments