“शिर्डी( प्रतिनिधी)-रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या श्री साईबाबांच्या शिकवणीनुसार कार्यरत असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये भाविकांच्या सेवाभावातून वेळोवेळी महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते. मुंबई येथील साईभक्त डॉ. श्रीराम अय्यर यांनी त्यांच्या प्रिज्मा ग्लोबल लिमिटेड, मुंबई या कंपनीमार्फत श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलसाठी १ कोटी ०४ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक 2D ECHO EPIQ CVX अल्ट्रासाऊंड मशिन देणगी स्वरूपात प्रदान केले आहे. या मशिनमुळे हृदयविकाराशी संबंधित तपासण्या अधिक अचूक, जलद व परिणामकारकपणे करता येणार असून रुग्णसेवेत मोठी मदत होणार आहे. सदर मशिनचे लोकार्पण व पूजन समारंभ दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी देणगीदार साईभक्तांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या प्रसंगी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल (नि.) डॉ. शैलेश ओक, प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप देवरे, डॉ. निलेश जाधव, बायोमेडिकल इंजिनिअर श्रद्धा कोते, जनसंपर्क अधिकारी श्री. सुरेश टोलमारे, परिचारिका, परिसेविका तसेच मयूर दाभाडे, प्रभाकर डांगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments