राष्ट्रसंत श्रीपाद बाबा पुण्यतिथी सोहळा पिंपरी निर्मळ येथे विविध कार्यक्रमांनी एक जानेवारीला होणार साजरा--महंत आत्माराम गिरीजी महाराज

शिर्डी( प्रतिनिधी )-दर वर्षाप्रमाणे यावर्षीही श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्मारामगिरी ट्रस्ट आयोजित राष्ट्रसंत श्रीपाद बाबा पुण्यतिथी सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पिंपरी निर्मळ तालुका राहाता येथे गुरुवार एक जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे.


   या संदर्भात प्रसिद्ध देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सालाबाद प्रमाणे यावर्षीही राष्ट्रसंत श्रीपाद बाबांचा 28 वा पुण्यतिथी सोहळा श्री नर्मदेश्वर आश्रमाचे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी विविध कार्यक्रम होणार असून सकाळी आठ वाजता श्रीपाद बाबांचा महाअभिषेक मंहत आत्मारामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत अस्तगाव, सावळीविहीर, पिंपरी निर्मळ, पानगव्हाण ,तसेच लोणी बुद्रुक तालुका वैजापूर येथील समस्त भजनी मंडळीचे वारकरी भजने होणार आहेत. त्यानंतर दुपारी एक ते दोन या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम ह भ प सौ सविताताई आबासाहेब औताडे व समस्त परिवार सरला बेट यांच्यातर्फे होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळेत हभप सौ. मंगलाताई आगलावे यांचे प्रवचन होणार असून या पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप महंत आत्माराम गिरीजी महाराज व कोलते सर हे करणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी, गुरुभक्तांनी उपस्थित राहावे. असे आवाहन मंहत आत्मारामगिरीजी महाराज गुरुभक्त प्रेमळ मंडळ यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments