राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र रुई हे श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे. श्री साई सतचरित्रातील चाळीसाव्या अध्यायात तसा उल्लेख आलेला आहे . मना आलिया साथी समासी! कधी बाबा जात राहत्याशी! कधी रुई व निमगावासी! असे म्हटल्याप्रमाणे साईबाबा हे रुई गावी येत असत.असे हे पवित्र क्षेत्र असून येथे श्री साईबाबांचे भव्य दिव्य मंदिर बांधलेले आहे. येथे दरवर्षी श्री साई सतचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षीही गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 25 ते गुरुवार एक जानेवारी 2026 या कालावधीत श्री साई सतचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कालावधीत दररोज सकाळी साडेपाच ते नऊ या वेळेत व्यासपीठ चालक ह भ प गजानन महाराज व ह भ प सचिन बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण अध्याय वाचन होणार आहे. येथील श्री साई सच्चरित्र पारायणाचे हे 22 वे वर्ष आहे. गुरुवार एक जानेवारी 2026 रोजी येथे सकाळी श्री साई प्रतिमा व ग्रंथ मिरवणूक होणार असून त्यानंतर काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी, साईभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा .असे आवाहन श्री साईबाबा प्रतिष्ठान, श्री साई संदेश प्रतिष्ठान ,रुई तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments