या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहता तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब नानासाहेब लावरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष रावसाहेब पवार हे होते.
जागतिक पेन्शनर्स दिना निमित्ताने जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन च्या वतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित अनेक सेवानिवृत्त पेन्शनर्स उपस्थित होते. अनेकांनी आपले मनोगते व्यक्त केली. व सर्व 75 वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा व पेन्शनर्स यावेळी सत्कार करण्यात आला. व सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक व पेन्शनर्स यांनी या असोसिएशनच्या अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे जागतिक पेन्शनर्स दिन व 75 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षक व पेन्शनरचा आवर्जून येथे कार्यक्रम ठेवून विशेष सत्कार केला याबद्दल आभार मानले. यावेळी फाजगे गुरुजी हे सेवानिवृत्त शिक्षक असून 75 वर्ष त्यांचे पूर्ण झाले आहे. त्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी या असोसिएशनला धन्यवाद देत यापुढेही सर्वांनी असेच वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवावे. त्या निमित्ताने सर्व एकत्र येत जातील असे सुचवले.या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक व विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त पेन्शनर्स उपस्थित होते.
0 Comments