भिल्ल समाजाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देणाऱ्या पक्षालाच मतदान करणार. एकलव्य सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांची घोषणा



सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

भिल्ल समाजाला  अहिल्यानगर जिल्हा परिषदचे अध्यक्षपद जो पक्ष देईल त्याच पक्षाला आदिवासी भिल्ल समाज मतदान करणार असल्याची घोषणा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी केली आहे.
        श्री. अहिरे यांनी म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुसूचित जमाती मधील महिलेसाठी राखीव झाले आहे. जिल्ह्यात आदिवासी भिल्ल समाजाचे निर्णायक मतदान आहे . भिल्ल समाजाची संख्या जास्त असताना प्रत्येक वेळी भिल्ल समाजाला डावलण्यात आले आहे जिल्ह्यात एकूण मतदानाच्या 20 टक्के मतदान केवळ भिल्ल समाजाचे आहे. तरी कोणताही पक्ष भिल्ल समाजाचा विचार करायला तयार नाही. केवळ मतदानापुरता वापर आतापर्यंत या राजकीय पक्षांनी केला आहे. परंतु आता हे चालणार नाही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ,काँग्रेस या प्रमुख पक्षातून जो पक्ष भिल्ल समाजाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देण्याची घोषणा करेल त्याच पक्षाला जिल्ह्यात भिल्ल समाज मतदान करेल अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर भिल्ल समाज जाहीर बहिष्कार टाकेल. कारण जर संख्येने आम्ही तुल्यबळ  असतांनाही आमचा जर विचारच होणार असेल तर केवळ तुमचे पक्ष मोठे करण्यासाठीच आम्ही मतदान करायचं का? आमचे काही  अस्तित्वच नाही का? भिल्ल समाजात देखील खूप पदवीधर व उच्चशिक्षित महिला आहेत. अशा महिलांचा विचार नक्कीच या पक्षांनी करावा. प्रत्येक गोष्टीत आम्ही अव्वल असताना देखील जाणीवपूर्वक आम्हाला डावलले जात असेल तर नक्कीच यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचे दिसत आहे. आम्हाला तुमच्या ताटातलं नको आमचा जो हक्क आहे तो हक्कच आम्ही मागतोय. तेव्हा जो पक्ष भिल्ल समाजाला अध्यक्ष पद देण्याची घोषणा करेल त्याच पक्षाच्या पाठीशी भिल्ल समाज उभा राहील अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकून सर्व राजकीय पक्षाच्या विरोधात निवडणुकीच्या काळातच आंदोलन केले जाईल. असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिल्याने  आता कोणता पक्ष भिल्ल समाजाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देण्याची घोषणा करतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments