सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील तगरे वस्ती येथे असलेल्या श्री विरभद्र मंदीरात सालाबादप्रमाणे बिरोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगाजल अभिषेक व बिरोबा महाराज मुर्तीचे नूतनीकरण पुजा करण्यात आली. यावेळी पुजेसाठी बाजार समितीचे संचालक मयुर पटाले दांम्पत्य बसले होते. रविवारी सकाळी स्वराज ग्रुप मित्र मंडळ यांच्यावतीने कावडीने गंगाजल आणून बिरोबा महाराज मुर्तीला गंगास्नान घालण्यात आले. त्यानंतर काठीची पुजा करून गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमूख आकर्षण डिग्रस येथील खारेकर भगत यांनी व्हईक सांगीतले. यावर्षी थंडी जास्त असणार असून गहु, हरबर्याचे चांगले पिक येईल व भाव उच्चांकी असेल असे सांगीतले. अवकाळी पाऊस पडेल, भाजीपाला तेजीत राहील, समाजात महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढेल त्यामुळे मुलींचे व महिलांचे रक्षण करावे असे आवाहन व्हईकामधून करण्यात आले.
0 Comments