शिर्डी ( प्रतिनिधी)-श्री साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने चेअरमन विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सत्तेत आल्यापासून नवनवीन संकल्पना राबवत विविध उपक्रम हाती घेतले असून गुरुवारी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते नूतन वर्षाच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह साई भक्तांच्या उपस्थितीत श्री साई संस्थानच्या झीरो नंबर हॉल येथे सोसायटीच्या नूतन दिनदर्शिकेच प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेत श्री साईबाबांच्या वर्षभर होणाऱ्या उत्सवांचा प्रामुख्याने समावेश असून येत्या १३ फेब्रुवारीला होणाऱ्या
ऐतिहासिक श्री साई परिक्रमा महोत्सवाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक पानावर श्री साईबाबांचे छायाचित्र आणि बेटी बचाव बेटी पढाओ यांसह पर्यावरण पूरक संदेश देत अनोख्या पद्धतीची ही दिनदर्शिका अतिशय सुंदर असल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देत श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन पोपटराव कोते, यांसह संचालक मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हा. चेअरमन पोपटराव कोते, संचालक मंडळ महादु कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते, मिलींद दुनबळे, तुळशिराम पवार, रविंद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, सौ.सुनंदा जगताप, सौ. लता बारसे, रंभाजी गागरे, भाऊसाहेब लबडे (तज्ञ संचालक), विलास वाणी (सचिव), बाबासाहेब अनर्थे (सह. सचिव), संभाजी कोते (सहा.सह. सचिव) यांचेसह कर्मचारी ,साईभक्त, यांची उपस्थिती होती.
0 Comments