श्री साईबाबा संस्थानला दुबईस्थित साईभक्ताचे सुवर्णदान



शिर्डी ( प्रतिनिधी)-श्री साईबाबा संस्थानला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. आज दुबई येथील एका साईभक्ताने श्री साई मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली आहे.

या खिडकीतून श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचे दर्शन होत असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी मुखदर्शनासाठी येतात. या ठिकाणी फ्रेमवर करण्यात आलेले सुवर्ण नक्षीकाम भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या कामाच्या प्रारंभी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर संबंधित साईभक्ताचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments