लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये झालेल्या या विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये केंद्रातील सुमारे 14 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जवळपास 108 विद्यार्थ्यांनी या गुणदर्शन स्पर्धेत सहभाग घेऊन वकृत्व, हस्ताक्षर ,शब्दावरून गोष्ट, वेशभूषा, समूहगीत ,व्यक्तिगत गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत या स्पर्धेचा उत्साह वाढवला. या स्पर्धेमध्ये किलबिल गट एक ते दोन तसेच मध्यम गट तीन ते चार व मोठा गट पाच ते आठ अशा गटात स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे सर, मुख्याध्यापिका खांडगे मॅडम व मेहत्रे सर, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक महाले सर, गुडघे सर ,गर्जे सर, बारसे सर ,सांगळे मॅडम, भांगरे मॅडम, पाचरकर मॅडम ,साबळे सर इत्यादी शिक्षकांनी हा विविध गुणदर्शन स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या स्पर्धा कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक तसेच पालकही उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments