या सप्ताह काळात दररोज पहाटे चार ते सहा काकडा भजन, सकाळी सहा ते आठ शिव महिमा, विष्णुसहस्रनाम व गीतापाठ तसेच सकाळी आठ ते नऊ या वेळेत अल्पोहार नाश्ता होऊन सकाळी नऊ ते बारा जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारी बारा ते दोन भोजन व विश्रांती, त्यानंतर दुपारी दोन ते पाच जगतगुरु तुकाराम महाराज चरित्र कथा, त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा सामुदायिक हरिपाठ होऊन सायंकाळी सहा ते आठ जाहीर हरी किर्तन होणार आहे. त्यानंतर आठ ते नऊ महाप्रसाद व रात्री नऊ ते 11 भजन संध्या कार्यक्रम होत आहेत. या सप्ताह काळामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार रामानचार्य विदर्भरत्न श्री ह भ प रामरावजी महाराज ढोक, नागपूर यांचे शुक्रवार 12 डिसेंबर २५ रोजी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान कीर्तन झाले. त्यानंतर शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी परमपूज्य गुरुवर्य ह भ प पांडुरंग महाराज घुले श्रीक्षेत्र देहू यांचे कीर्तन संपन्न झाले. तसेच रविवार 14 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजता ह भ प ज्ञान सिंधू संदिपान महाराज शिंदे (श्री क्षेत्र आळंदी देवाची ) यांचे कीर्तन होणार आहे.तर सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजता परमपूज्य ज्ञानेश भक्त वेदांतचार्य हभप अर्जुन महाराज लाड गुरुजी, मंगळवार 16 डिसेंबर रोजी परमपूज्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे.तसेच बुधवार 17 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजता वेदशास्त्रसंपन्न वेदांत भास्कर परमपूज्य श्री गुरु ह भ प गाथामूर्ती चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर , तर गुरुवार 18 डिसेंबर रोजी सायंकाळी परमपूज्य श्री श्री गुरु ह भ प चैतन्यजी महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होणार असून सकाळी दहा ते बारा वाजता संतवीर परमपूज्य गुरुवर्य ह भ प बंडातात्या कराडकर यांचे काल्याचे किर्तन होऊन त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान विशेष कार्यक्रम म्हणून मंगळवार दिनांक 16 डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा ते बारा यादरम्यान समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे.त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते बारा यादरम्यान परमपूज्य गुरुवर्य हभप ज्ञानेश्वर महाराज कदम( मोठे कदम माऊली) अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांचे कीर्तन होणार आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज चरित्र गाथा सोहळा वेदशास्त्रसंपन्न वेदांत भास्कर परमपूज्य श्रीगुरु ह भ प गाथामूर्ती चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या कथेसाठी भजन साथ हभप अरुण भैय्या पगारे, ह भ प समाधान महाराज चोपडे, ह भ प निलेश महाराज पगार ,ह भ प दीपक महाराज खरात ,ह भ प महेशजी महाराज वाढवणकर, नागनाथ महाराज गोरडे , वैभव महाराज वेलजाळी, ह भ प शरद महाराज दिघे, ह भ प संपत काका जाधव यांची राहणार आहे. हे सर्व कार्यक्रम सिद्धयोगीराज जगद्गुरु लक्ष्मणगिरीजी महाराज संजीवनी समाधी मंदिर मठ, श्री क्षेत्र वावी ,ता. सिन्नर जि. नाशिक येथे होत आहेत. या कार्यक्रमाचे संयोजक ह भ प उमेशजी महाराज दशरथे, ह भ प ज्ञानेश्वरजी महाराज जवळेकर, ह भ प अंकुरजी महाराज साखरे, ह भ प प्रकाशजी महाराज साठे, ह भ प संपत काका जाधव, उद्योजक गणेश दादा भांड,आदी आहेत.अशी माहिती या कार्यक्रमाचे स्वागतोत्सव सद्गुरु रामगिरीजी महाराज सेवा संस्थान श्रीक्षेत्र वावी तालुका सिन्नरचे अध्यक्ष ह भ प किर्तनकेसरी पांडुरंग महाराज गिरी वावीकर व ह भ प कृष्णा महाराज गिरी यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.
0 Comments