आमच्या मातीत कबड्डी,अनं आमच्या रक्तात ही कबड्डी

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
 
टाकळीभान( प्रतिनिधी ) नुकत्याच कर्जत येथे झालेल्या तीन ऑक्टोबर रोजी च्या कबड्डी सामन्यात समर्थ विद्यालय कर्जत विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान हा 17 वर्षे वयोगटातील कबड्डी सामना चालू असताना अचानक ग्रामस्थांनी टाकळीभान विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण केली असता सामना रद्द करण्यात आला होता तो सामना परत व्हावा यासाठी वेळोवेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर कुरंगे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता परंतु योग्य अहवाल आल्याशिवाय सामना परत घेतला जाणार नाही या आश्वासनानंतर टाकळीभान ग्रामस्थांनी 16 ऑक्टोबर 2025 रोजी टाकळीभान पोलीस स्टेशन समोर राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता तब्बल दोन तास चालणारा रस्ता रोको अखेर आश्वासनानंतर मागे घेण्यात आला त्यानंतर सामन्यातील पंच व सामनाधिकारी यांच्या लेखी अहवालानंतर योग्य निर्णय घेऊन ज्ञानेश्वर खुरंगे यांनी खेळ देवता समजून योग्य असा निर्णय देऊन समाजाला खेळाचे अनमोल महत्त्व दाखवून दिले 

            अखेर आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५* रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुरंगे  यांच्या दालनात झालेल्या बैठकीत न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय,टाकळीभान व समर्थ माध्यमिक विद्यालय,कर्जत हा कबड्डी सामना सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठिक : ९ वाजता वाडिया पार्क,अहिल्यानगर येथे खेळवण्याचा निर्णय ज्ञानेश्वर करून यांनी घेतला  खिलाडूवृत्ती व जिल्हा क्रीडा अधिकारी या खेळाच्या अतूट नात्याने ज्ञानेश्वर खुरंगे यांनी नात्यांच्या पलीकडे जाऊन कर्तव्याला व खेळाला  महत्व देत व कबड्डी खेळाचा चा सन्मान राखत आलेल्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेत  कबड्डी सामना पुन्हा घेण्याबाबत आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने  मा.जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.ज्ञानेश्वर'जी खुरंगे साहेब यांना टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने व समस्त देशपातळीपर्यंत खेळाचे महत्व पटवून देणाऱ्या क्रीडा शिक्षक तथा देश पातळीवर नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंकडून खुरंगे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे खुरंगे  यांची महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन   सन्मान करण्यात आला,लवकर टाकळीभान नगरीत कुमार - कुमारी कबड्डी जिल्हा निवड चाचणीचे सामने होणार असून,या स्पर्धेचेही निमंत्रण जिल्हा अधिकारी श्री.ज्ञानेश्वर'जी खुरंगे साहेब यांना देण्यात आले असून,त्यांनी टाकळीभान कबड्डी संघला योग्य न्याय दिल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे .

      टाकळीभानच्या कबड्डी खेळाडूंना  योग्य तो न्याय मिळावा व कबड्डी या खेळाचा सन्मान राहवा यासाठी नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील  जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर .खासदार श्री.भाऊसाहेब वाकचौरे  शिर्डी लोकसभा  आमदार श्री.हेमंततात्या ओगले साहे श्रीरामपुर,विधानसभा  यांनी योग्य ती दखल घेण्याबाबत मोलाचे  सहकार्य लाभले. त्याचबरोबर टाकळीभान गावातील कबड्डीचे अस्तित्व निर्माण करणारे सर्वच कबड्डीचे प्रशिक्षक यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

Post a Comment

0 Comments