सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथील यादव कालीन पुरातन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली.
श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात कोजागिरी पौर्णिमे पासून काकड आरती सुरू असून आज गुरूवार दिनांक ३० रोजी वंदना मुरकुटे या विठ्ठलाचे दर्शन व काकड आरती निमित्त मंदिरात आल्या असतांना त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
आरती नंतरत्यांचा देवस्थानच्या वतीने ह. भ. प. संगिताताई शेजूळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदिराचे पुजारी विजय देवळालकर, वैशाली देवळालकर, माजी सरपंच जमुना गायकवाड, मंगल राजळे, मिरा बडाख, लहानबाई बोडखे, गोकुळ भालेराव, गोरक्षनाथ जाधव, अशोक शेळके, सुरेश बनकर, केरूबापू मगर, मच्छिंद्र शिंदे, साहेबराव बोडखे, भारत परदेशी, दत्तात्रय पटारे, दत्तात्रय दाभाडे नानासाहेब लेलकर ,आदी उपस्थित होते.
0 Comments