सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
शिर्डी (राजकुमार गडकरी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे विवेक गायकवाड यांचे महा डिजिटल ग्रामीण सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सावळीविहीर बुद्रुक येथील नगर मनमाड रस्त्याच्या कडेला सदाफळ कॉम्प्लेक्स मधील एका व्यापारी गाळ्यामध्ये हे महा डिजिटल ग्रामीण सेवा केंद्र सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन अ.भा. सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यांच्या हस्ते व राहता येथील बौद्धाचार्य आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाठीया , सोमनाथ आगलावे, संतोष आगलावे, दिलीप सदाफळ, किरण आगलावे, जिजाबा आगलावे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बाळासाहेब जनार्दन जपे यांनी या दुकानाचे फीत कापून उद्घाटन केल्याचे जाहीर करत महा डिजिटल ग्रामीण सेवा केंद्र व चालक विवेक गायकवाड यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. विवेक गायकवाड, संतोष गायकवाड व गायकवाड परिवारातर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करत आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला भाऊसाहेब सातदिवे, विलासराव भोसले, पत्रकार राजेंद्र गडकरी, अमर झिंजुर्डे, आदी सह नागरिक महिला युवक उपस्थित होते. यावेळी या महा डिजिटल ग्रामीण सेवा केंद्राची माहिती देताना संतोष गायकवाड यांनी सांगितले की, येथे झेरॉक्स, कलर प्रिंट, आधार पेमेंट ,आधार कार्ड, दुरुस्ती आदी सह विविध डिजिटल कामे झटपट केले जाणार असल्यामुळे या ग्रामीण भागातील नागरिकांना युवकांना विद्यार्थ्यांना महिलांना वृद्धांना त्यामुळे मोठा फायदा होणार आहे. तरी गरजूंनी या महा डिजिटल ग्रामीण सेवा केंद्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन विवेक गायकवाड व संतोष गायकवाड यांनी केले.असून
0 Comments